Liam Payne Death – लियाम पायनेच्या शवविच्छेदनातून धक्कादायक खुलासे

Liam Payne Death – लियाम पायनेच्या शवविच्छेदनातून धक्कादायक खुलासे

जगप्रसिद्ध इंग्लिश पॉप बँड वन डायरेक्शनचा माजी सदस्य गायक लियाम पायने याचा मृत्यू झाला आहे. गायक ब्यूनस आयर्समधील एका हॉटेलमध्ये थांबला होता जेथे तो अचानक तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून पडला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

न्यूज 18 मधील वृत्तानुसार, तिसऱ्या मजल्यावरुन पडल्यानंतर पायने बेशुद्ध झाला होता आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्याला वाचवता आले नाही. ब्यूनस आयर्स पब्लिक प्रोसिक्युटर ऑफिसने तपास केला असता त्याचा संशयास्पद मृत्यू मानले जात आहे. अधिकाऱ्यांना संशय आहे की पायने याने पडण्यापूर्वी त्याने जास्त प्रमाणात ड्रग्स किंवा अल्कोहोलचे सेवन केले होते, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलीस तज्ज्ञांना पायनेच्या हॉटेलच्या खोलीत ड्रग्ज, अल्कोहोल आणि तुटलेले फर्निचर सापडले, ज्यामुळे तो चिंता आणखी वाढली. पायनेच्या दुखापतींवरून असे दिसून येते की, ज्यावेळी तो पडला त्यावेळी तो शुद्धीत नव्हता.

त्यादिवशी पायनेच्या खोलीत उपस्थित असलेले तीन कर्मचारी, दोन महिलांसह इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आला आहे. हे लोक घटनेच्या काही वेळापूर्वी पायनेच्या खोलीत गेले होते आणि पायनेचे वागणे थोडे विचित्र असल्याचे सांगितले होते. पायनेच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी हॉटेल कर्मचारी चिंतित झाले होते आणि गायकाच्या विचित्र वागणुकीमुळे त्यांनी 911 वर कॉल केला होता. पायने कसा पडला आणि आजूबाजूला घडलेल्या घटनाक्रमाचा तपास तपासकर्ते कसून करत आहेत. यात तिसऱ्या व्यक्तीचा हात आहे का, याचाही शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अपघाताच्या वेळी पायने खोलीत एकटाच होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;