ऐश्वर्या राय हिच्याबद्दल ‘तो’ मोठा खुलासा, अभिनेत्री बॉडीगार्ड्सला…

ऐश्वर्या राय हिच्याबद्दल ‘तो’ मोठा खुलासा, अभिनेत्री बॉडीगार्ड्सला…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय. ऐश्वर्या राय सोशल मीडियावर सक्रिय असते. ऐश्वर्या रायला काही दिवसांपूर्वीच तिच्या अभिनयासाठी पुरस्कार देखील मिळालाय. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सातत्याने सांगितले जातंय. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यातील वाद वाढला असून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र, सततच्या चर्चांवर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये.

ऐश्वर्या राय ही अत्यंत मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठा खुलासा करण्यात आलाय. ऐश्वर्या राय ही तिच्या बॉडीगार्ड्सला मोठा पगार देते. हेच नाही तर लाखोंच्या घरात त्यांचा पगार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या राय हिचा बॉडीगार्ड शिवराज तिच्यासोबत आहे. लाखोंच्या घरात त्याची पगार आहे. 

रिपोर्टनुसार, शिवराज याची एका महिन्याची पगार लाखोंच्या घरात आहे. ऐश्वर्या राय हिचे दुसरे बॉडीगार्ड राजेंद्र ढोले यांची वर्षाची कमाई 1 कोटी आहे. म्हणजेच काय तर ऐश्वर्या राय ही आपल्या बॉडीगार्डला चांगला पगार देते. शिवराज हे गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या राय हिच्यासाठी काम करत आहेत. ऐश्वर्याच्या सुरक्षेची काळजी त्यांच्याकडे आहे.

ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून सतत विदेशात जाताना दिसत आहे. यावेळी अभिषेक बच्चन हा तिच्यासोबत दिसत नाहीये. मुलगी आराध्या बच्चन हिलाच घेऊन ऐश्वर्या विदेशात जाते. ऐश्वर्याला तिच्या बेस्ट अभिनयासाठी पुरस्कार मिळाला, यावेळी बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच उपस्थित नव्हते, यावेळी फक्त मुलगी आराध्या तिच्यासोबत होती.

ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडला असून ती सध्या तिच्या आईच्या घरी शिफ्ट झाल्याचेही सातत्याने सांगितले जातंय. मात्र, घटस्फोटाच्या चर्चांवर कोणीच भाष्य करताना दिसत नाहीये. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या ही जलसा बंगल्यात जाताना दिसली. यावेळी तिच्यासोबत तिची लेक आराध्या बच्चन दिसली. श्वेता बच्चन हिच्या नावावर काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्षा बंगला केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;