सूरज सहानुभूतीच्या जोरावर बिग बॉस जिंकला? टीकेवर निक्की म्हणाली, मी जिंकले असते तर..
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने 'बिग बॉस मराठी 5'चं विजेतेपद पटकावलं. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता प्रभू वालावलकर यांना तगडी टक्कर देत त्याने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निक्कीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सूरज जिंकेल याची मला कल्पना नव्हती. पण जर चाहत्यांनी त्याला विजेता बनवलं असेल तर त्याला नाकारणारी मी कोण? जे तुमच्या नशिबात असतं तेच तुम्हाला मिळतं. कदाचित बिग बॉसची ट्रॉफी माझ्या नशिबात नव्हती. माझ्या नशिबात खूप सारं प्रेम होतं, जे मला मिळालं. त्यामुळे मी खुश आहे", असं निक्की म्हणाली.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या या मुलाखतीत निक्की पुढे म्हणाली, "सूरज सहानुभूतीच्या जोरावर ट्रॉफी जिंकला अशा कमेंट्स मी वाचल्या होत्या. पण जर मी ती ट्रॉफी उचलली असती तर माझ्या चाहत्यांनी माझा द्वेष केला असता. आता चाहते त्याचा द्वेष करत आहेत. हे चक्र असंच सुरू असतं. त्यामुळे सत्य स्वीकारून आयुष्यात पुढे जायचं असतं."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List