‘कर्मयोगी आबासाहेब’चा दमदार ट्रेलर पाहिलात का? गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा

‘कर्मयोगी आबासाहेब’चा दमदार ट्रेलर पाहिलात का? गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा

राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध ‘कर्मयोगी आबासाहेब’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. येत्या 25 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट मराठीसह हिंदी भाषेतही जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव, अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या भूमिका आहेत.

मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे. आता प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. मात्र, समाजाचा उद्धार, उन्नती करण्यासाठी गणपतराव देशमुख यांच्यासारखे नेते विरळच… त्यामुळेच ‘कर्मयोगी आबासाहेब’ या चित्रपटातून गणपतराव देशमुख यांच्या हळव्या, कर्तव्यकठोर, कृतीशील, विचारी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला आहे. अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येताना त्यांनी केलेला संघर्ष, त्यातलं राजकारण उलगडतानाच त्यांनी केलेला विकास, सुधारणा, शेतकरी, वंचित घटकांसाठीचं काम दाखवण्यात आलं आहे. त्यामुळेच जनतेनं आबासाहेबांवर अलोट प्रेम केलं. या सर्वांचं दर्शन ‘कर्मयोगी आबासाहेब’ या चित्रपटातून घडणार आहे.

आबासाहेब यांनी राज्याच्या राजकारण, समाजकारणात महत्त्वाचं योगदान दिलं. तब्बल अकरा वेळा ते आमदार झाले. त्यात दोनवेळा कॅबिनेट मंत्रीपद भुषवण्याची संधी त्यांना मिळाली. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजासाठी योगदान देणाऱ्या, आपल्या भागाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा वेध चित्रपटातून घेण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;