Salman Khan : सलमान खानचा ‘या’ ठिकाणी गेम करण्याचा प्लान होता; आरोपपत्रातील स्फोटक माहिती समोर

Salman Khan : सलमान खानचा ‘या’ ठिकाणी गेम करण्याचा प्लान होता; आरोपपत्रातील स्फोटक माहिती समोर

राष्ट्रवादीचे आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यानंतर पुन्हा एकदा बिश्नोई गँगची चर्चा सुरू झाली आहे. बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी बिश्नोई गँगने सलमना खानच्या घराबाहेरही गोळीबार केला होता. त्याचीही चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी आज या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. बिश्नोई गँगला सलमान खानची हत्या कुठे करायची होती याचा खुलासा या आरोपपत्रात करण्यात आला आहे. आरोपपत्रात अनेक स्फोटक माहिती देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

बिश्नोई गँगला सलमान खानचा गेम चित्रीकरणाच्यावेळी किंवा पनवेलचा फार्महाऊस सोडताना करायचा होता. त्यासाठी 25 लाखांची सुपारी देण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती या आरोपपत्रात देण्यात आली आहे. पनवेलच्या फार्म हाऊसमधून सलमान बाहेर पडत असतानाच त्याच्यावर गोळ्या झाडायच्या होत्या. त्यामुळेच या फार्म हाऊसची रेकी करण्यात आली होती. सलमान कुठे जातो, कसा जातो? त्याचं डेली रुटीन काय आहे, यावर आरोपी लक्ष ठेवून असल्याचं समोर आलं आहे.

डोगरच्या संपर्कात

फेब्रुवारीत ही रेकी झाली होती. पण सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली होती. पोलिसांनी हरियाणातून एका व्यक्तीला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याचं नाव सुखबीर बलबीर सिंग ऊर्फ सुखा असल्याचं समोर आलं. सलमान खानच्या मारेकऱ्यांना तो शस्त्र पुरवत होता. विशेष म्हणजे हा सुखा पाकिस्तानातील डोगर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. त्याच्याकडूनच सुखा हत्यारे घेत असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

लूक बदलून फिरायचा

सुखा हा दाढी आणि केस वाढवून फिरत होता. त्याने आपला लूक बदलला होता. पानिपतमधील एका हॉटेलात तो लपला होता. पण पोलिसाांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला 4 जून रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून सलमानच्या फार्म हाऊसची एक दोन नव्हे तर तब्बल 16 ते 17 जणांनी रेकी केल्याचं आढळून आलं आहे. म्हणजे आरोपींनी सलमानला उडवण्याचा फुल्ल प्लानच केल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.

सुखा पाकिस्तानचा

सुखा हा मूळचा पाकिस्तानचा आहे. तो आणि पाकिस्तानातील डोगर नावाचा व्यक्ती सोबत काम करतात. दोघेही शस्त्रास्त्र पुरवण्याचं काम करत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. त्यानुसार आरोपींची धरपकडही सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी आता खटल्याची सुनावणी सुरू झाल्यावर अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;