शाहरुख खान स्वतःच्या मृत्यूबद्दल असं का म्हणाला? किंग खानने व्यक्त केली शेवटची इच्छा
Shah Rukh Khan Last wish: बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत शाहरुख खान बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आजही शाहरुख खान याच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत चाहते असतात. वयाच्या 58 व्या वर्षी देखील शाहरुख खान चाहत्यांच्या मनावर आणि मोठ्या पडद्यावर राज्य करत आहे. सांगायचं झालं तर, अभिनेता गेल्या तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.
शाहरुख खान गेल्या तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण पूर्ण आयुष्य अभिनय करणार का? या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्याने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिलं. किंग खान म्हणाला, ‘जोपर्यंत मला मृत्यू येत नाही, तोपर्यंत मला अभिनय करायचा आहे. मझ्या आयुष्यातील एक स्वप्न आहे. कोणी ॲक्शन म्हणत राहिल आणि मला कधी जागच यायला नको…’
‘मी कधीच गंभीर अभिनेता नव्हतो. मी फक्त अभिनयाच्या माध्यमातून आयुष्याचा आनंद साजरा करत असतो.’ असं म्हणत शाहरुख खान स्वतःची शेवटची इच्छा व्यक्त केली. शाहरुख खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचं बालपण गरिबीत गेलं.
लहाणपणी परिस्थिती बिकट असली तरी, शाहरुख खान कायम आई – वडिलांनी दिलेल्या संस्कारांवर पुढे आला. शाहरुख खान याच्या वडिलांचं नाव मोहम्मद खान असं होतं. ते एक स्वातंत्र्य सैनिक होते. शाहरुख खान कायम त्यांचे आई – वडिल आणि त्यांनी दिलेल्या संस्काराबद्दल बोलत असते. शाहरुख खान कायम कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
शाहरुख खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 2023 मध्ये चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण केलं. 2023 मध्ये ‘पठाण’ सिनेमातून अभिनेत्या बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण केलं. ‘पठाण’ नंतर अभिनेता ‘जवान’, ‘डिंकी’ सिनेमात झळकला. अभिनेत्याच्या तिनही सिनेमांनी भरभरुन कमाई केली. आता शाहरुख खान ‘किंग’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शाहरुख खान पहिल्यांदा लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List