मिंधेंच्या खासदार पुत्राने महाकाल मंदिराचे नियम मोडले, श्रीकांत शिंदेंवर होणार कारवाई?

मिंधेंच्या खासदार पुत्राने महाकाल मंदिराचे नियम मोडले, श्रीकांत शिंदेंवर होणार कारवाई?

मध्य प्रदेशच्या उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिराचे नियम तोडल्याचे प्रकरण समोर आले आहे. महाकाल मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पूजाअर्चा करण्याची कोणालाच परवानगी नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, पत्नी आणि दोन अन्य लोकांनी गर्भगृहात जाऊन पूजा केल्याचा गंभीर आरोप आहे. मागच्या वर्षी मंदिर प्रशासनाने मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशबंदी केली होती. मात्र, वेळोवेळी व्हीआयपीच्या नावाने या नियमांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जातात.

जागरणच्या वृत्तानुसार, गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीसह अन्य दोघांनी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पूजाअर्चा केली. त्यांनी जवळपास सहा मिनीटे तिथे पूजा केली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत मंदिराचे सुरक्षा प्रभारी जयंत राठोड आणि गर्भगृहाचे निरीक्षक उपस्थित होते.

गेल्या वर्षी पुजारी सोडून इतर सर्वांना गर्भगृहात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. असे असतानाही नियम मोडण्याचा प्रकार सुरूच आहे. गर्भगृहात कोणालाही प्रवेश दिला जात नाही, असे जिल्हाधिकारी आणि महाकाल मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणाले. तर दुसरीकडे प्रशासक गणेश धाकड कारवाईबाबत बोलले आहेत. याबाबत गर्भगृह निरीक्षक आणि इतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान, तरानाचे आमदार महेश परमार यांनीही गर्भगृहात व्हीआयपी प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मंदिराच्या नियमानुसार, भाविकांना 50 फुट अंतरावरून महाकालचे दर्शन दिले जाते. गर्भगृहात पुजाऱ्यांशिवाय अन्य कोणी जात नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;