‘बिग बॉस मराठी 5’च्या ग्रँड फिनालेला मिळाला इतका TRP; महाराष्ट्रभर झाली चर्चा

‘बिग बॉस मराठी 5’च्या ग्रँड फिनालेला मिळाला इतका TRP; महाराष्ट्रभर झाली चर्चा

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी 5’ हा सर्वांत लोकप्रिय आणि चर्चेत राहिलेल्या शोचा महाअंतिम सोहळा 6 ऑक्टोबर रोजी पार पडला. ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले कसा असणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. अखेर अनेक रोमांचक ट्विस्ट, धमाकेदार टास्क आणि सदस्यांच्या एकापेक्षा एक परफॉर्मन्स सादर करत अत्यंत उत्साहात हा महाअंतिम सोहळा पार पडला. भाऊच्या धक्क्यावर काही दिवस सूत्रसंचालक रितेश देशमुख न दिसल्याने प्रेक्षकांनी त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. पण ग्रँड फिनालेला त्याने सर्व कसर सोडत आपला जलवा दाखवला. या महाअंतिम सोहळ्याने आता टीआरपीच्या शर्यतीतदेखील चांगलीच बाजी मारली आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे.

महाराष्ट्राच्या घराघरांत 6 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 च्या ठोक्याला प्रेक्षक टीव्हीसमोर बसून आपल्या कुटुंबीयांसोबत ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले पाहत होते. या पर्वाचा महाविजेता कोण होणार हे जाणून घेण्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. ‘बिग बॉस’प्रेमी या पर्वाचा विजेता कोण होणार याबद्दल व्हिडीओ कॉल्स आणि व्हॉट्सअप ग्रुपद्वारे चर्चा करत होते. प्रेक्षकांच्या या अफाट प्रेमामुळे ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले इतिहासातील सर्वात भव्य ठरला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या सिझनच्या ग्रँड फिनालेला 5.0 टीव्हीआर मिळालं आहे. तर शनिवारच्या विशेष भागाला 4.2 टीव्हीआर मिळालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्यातील लाडक्या भाऊच्या जादूने महाराष्ट्राला वेड लावलं. ‘बेबी ब्रिंग इट ऑन’ या गाण्यावर रितेश भाऊने कमाल डान्स केला. त्याच्या थक्क करणाऱ्या परफॉर्मन्सने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. महाअंतिम सोहळ्यातील रितेश भाऊचा हा कल्ला जबरदस्त गाजला. सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता प्रभू-वालावलकर, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी या टॉप 6 सदस्यांच्या परफॉर्मन्सने महाअंतिम सोहळ्याला चार चाँद लावले. याच ग्रँड फिनालेला महाराष्ट्राला या पर्वाचा महाविजेता मिळाला.

ग्रँड प्रीमिअरपासून चर्चेत असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी 5’चा बोलबाला ग्रँड फिनालेपर्यंत कायम राहिला. संपूर्ण महाराष्ट्राने या सिझनला भरभरून प्रेम दिलं. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच मातीशी जोडलेला गुलीगत सूरज चव्हाण या पर्वाचा महाविजेता ठरला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;