“मला पश्चात्ताप..”; अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका स्पष्टच बोलली

“मला पश्चात्ताप..”; अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका स्पष्टच बोलली

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येते. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्याआधी बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या. नेहमी एकमेकांसोबत दिसणारे अर्जुन आणि मलायका एका कार्यक्रमात समोर येऊनही एकमेकांना टाळताना दिसले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ग्लोबल स्पा मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत मलायका तिच्या आयुष्यातील काही आव्हानात्मक परिस्थितींबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

जून महिन्यात अर्जुनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये मलायका कुठेच दिसली नव्हती. इतकंच नव्हे तर तिने त्याला शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्टसुद्धा लिहिली नव्हती. यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र एकमेकांच्या खासगी आयुष्याचा आदर करत असल्याने परस्परसंमतीने ब्रेकअप केल्याची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तीने दिली. म्हणूनच एका फॅशन शोदरम्यान मलायका आणि अर्जुन एकमेकांपासून दूर बसले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

“स्वत:लाच खोलवर जाणून घेण्यास तुम्हाला कठीण परिस्थितीतही धैर्य मिळतं”, असं मलायका या मुलाखतीत म्हणाली. अशा परिस्थितीत कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींची खूप साथ मिळाल्याचंही तिने सांगितलं. “आयुष्यातील कठीण प्रसंगात मानसिक शांती आणि संयम राखण्या माझे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि कामसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. मी खंबीर राहावी यासाठी माझ्या आजूबाजूची लोकं मला खूप मदत करतात. माझ्या मैत्रिणींशिवाय मी काहीच नाही. ते माझी काळजी घेतात, मला पाठिंबा देतात, प्रेरणा देतात. ते माझ्यासाठी सर्वस्व आहेत”, अशा शब्दांत मलायका व्यक्त झाली. अभिनेत्री करीना कपूर, करिश्मा कपूर आणि बहीण अमृता अरोरा या मलायकाच्या खास मैत्रिणी आहेत.

आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करूनही कोणत्याच गोष्टीचा पश्चात्ताप नसल्याचं तिने स्पष्ट केलं. “माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाने मला घडवलं आहे. मी कोणत्याच पश्चात्तापाशिवाय जगते आणि ज्याप्रकारे गोष्टी घडल्या त्यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते”, अशी प्रतिक्रिया तिने दिली.

मलायका आणि अर्जुन हे 2018 मध्ये एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;