मुंबई विद्यापीठाच्या चर्चगेट वसतिगृहात दुर्गंधीमुळे विद्यार्थी आजारी; युवा सेनेचा आंदोलनाचा इशारा

मुंबई विद्यापीठाच्या चर्चगेट वसतिगृहात दुर्गंधीमुळे विद्यार्थी आजारी; युवा सेनेचा आंदोलनाचा इशारा

चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठाच्या जगन्नाथ शंकरशेट वसतिगृहातील गटारे गेल्या काही दिवसांपासून तुंबली आहे. त्यामुळे वसतिगृहाच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत. याची दखल घेत युवा सेनेने आज विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाने त्यावर तात्पुरती सफाई केली असून कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे.

वसतिगृहातील विद्यार्थ्यानी वसतिगृह प्रमुखांकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या, परंतु त्याची काहीच दखल न घेतली गेल्याने विद्यार्थ्यानी शिवसेना नेते,युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या सूचनेवरून युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी वसतिगृहाचा आढावा घेऊन पाहणी केली.

सदर गटार लाईन तातडीने दुरुस्ती करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी युवा सेनेने केली. विनापरवानगी आंदोलन केल्यास कारवाई करण्याची कितीही फर्माने विद्यापीठाने काढली तरी विद्यार्ध्यांच्या आरोग्याचा विचार करून युवा सेना याप्रश्नी  कोणत्याही कारवाईला न जुमानता तीव्र आंदोलन करेल, असा इशारा युवा सेनेने दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;