विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी’ आणि ‘पिपाणी’ चिन्हात गफलत होणार नाही, शरद पवार यांचा विश्वास

विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी’ आणि ‘पिपाणी’ चिन्हात गफलत होणार नाही, शरद पवार यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीवेळी पिपाणीच्या अनुषंगाने चित्र स्पष्ट नव्हते. परंतु, आता विधानसभा निवडणुकीत ते चित्र अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘तुतारी’ आणि ‘पिपाणी’ चिन्हामध्ये गफलत होणार नाही, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड येथे व्यक्त केला.

कराड येथे आज पत्रकारांशी संवाद साधताना पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. आमच्या पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जागा वाटपासंदर्भात चर्चा करत आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीवेळी ‘पिपाणी’ चिन्हामुळे नुकसान सोसावे लागल्याविषयी विचारले असता, चिन्हाच्या बाबतीत आता चित्र स्पष्ट झाले असून, विधानसभा निवडणुकीत ‘पिपाणी’चा कोणत्याही प्रकारे फटका बसणार नाही, अशी आपण अपेक्षा करूया, असे शरद पवार म्हणाले. दरम्यान, जरांगे-पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यांचा ठाम निर्णय झाल्यानंतरच यावर बोलणे उचित होईल, असे उत्तर त्यांनी यासंदर्भातील प्रश्नावर दिले.

अजित पवार गटाच्या बबनदादा शिंदे यांच्या भेटीबाबत विचारले असता, सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. त्याबरोबरच अन्य कारणांसाठीही अनेकजण भेटायला येत असतात. त्यामुळे कुणी भेटायला आलं, तर आपण काय करणार, असा सवाल पवार यांनी केला. बबनदादा कित्येक वर्षं आमच्या सोबत आहेत. आमच्याच विचाराने ते आमदार झालेत. त्यांनी जी भूमिका घेतली होती, त्यामुळे जनतेत नाराजी होती. परंतु, आता त्यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी, आमच्यातला सलोखा काही संपत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरन्यायाधीशांनी घेतलेला निर्णय योग्यच!

n सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत विचारले असता, न्याय देवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, न्याय देवतेच्या हातात तराजूऐवजी संविधान देण्यात आल्याची बाबही चांगली आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. सरन्यायाधीश यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असून देशात असा निर्णय कधीच झाला नसता, तो त्यांनी घेतला आहे, असेही पवार यांनी सांगितले.

तरुण चेहऱयांना संधी देणार – जयंत पाटील

n जयंत पाटील म्हणाले, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची जबाबदारी आहे. तसेच बाहेरील पक्षातून आमच्याकडे येणाऱयांची संख्या जास्त आहे. परंतु, आमच्याकडे अनेक चांगले तरुण चेहरे असून, त्यांना आम्ही प्राधान्याने संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;