हिंदुस्थानची चीनमधून आयात वाढली, ‘मोदी है तो मुमकीन है’… कुठं गेली ‘मेड इन इंडिया’ पॉलिसी

हिंदुस्थानची चीनमधून आयात वाढली, ‘मोदी है तो मुमकीन है’… कुठं गेली ‘मेड इन इंडिया’ पॉलिसी

सीमावादावरून हिंदुस्थान-चीनदरम्यान तणाव वाढलेला असला तरी व्यापाराच्या बाबत चित्र वेगळे आहे. चीन हा हिंदुस्थानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार ठरला आहे. या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान चीनमधून आयात व्यापाराची उलाढाल  56.29 अब्ज डॉलर एवढी झाली, तर निर्यात

भागीदार मध्ये  अमेरिका टॉपवर आहे. हिंदुस्थानची अमेरिकेची निर्यात 5.62 टक्क्यांनी वाढून 40.38 अब्ज डॉलर झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत हिंदुस्थानची चीनमधून आयात 11.5 टक्के वाढली. चीन, रशिया, यूएई, अमेरिका, इराक, सौदी अरब, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, सिंगापूर या देशांमध्ये हिंदुस्थानातून जास्त आयात होते. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान रशियामधून आयात वाढून ती 32.18 अब्ज डॉलर झाली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 30.43 अब्ज डॉलर एवढी होती. यूएईमधील आयातही वाढली आहे.

चीनमध्ये निर्यात

अमेरिका, यूएई, नेदरलँड, ब्रिटन, चीन, सिंगापूर, सौदी अरेबिया, बांगलादेश, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिका हे हिंदुस्थानच्या निर्यातीचे टॉप 10 देश आहेत. चीनमध्ये आपण 6.91 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे. या वर्षी यूएईमध्ये एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान हिंदुस्थानची निर्यात वाढून 17.24 अब्ज डॉलर झाली आहे.

2023-24 मध्ये हिंदुस्थानचा नंबर पहिल्या स्थानावर आहे. त्याखालोखाल चीन दुसऱया क्रमांकावर आहे. चीन 2013-14 पासून 2017-18 आणि 2020-21 मध्ये हिंदुस्थानचा आघाडीचा व्यापारी भागीदार होता. चीनच्या आधी संयुक्त अरब अमिरातीशी हिंदुस्थानचा व्यापार मोठय़ा प्रमाणात होता. 2021-22 आणि 2022-23 मध्ये अमेरिका हा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;