चेंबूर येथील वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

चेंबूर येथील वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

चेंबूर येथील वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री समोर आली. याबाबत वसतिगृह अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर चेंबूर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत चौकशी सुरू केली आहे.

चेंबूर नाका येथील बेगर्स होम परिसरात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचे शासकीय वसतिगृह आहे. तेथे अनेक विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत. दीक्षा कांबळे (23) ही विद्यार्थिनीदेखील तेथे राहत होती. मूळची देवगडची असलेली ही विद्यार्थिनी वरळी येथील सस्मीरा इन्स्टिटय़ूट कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयात बीएसी आयटीच्या द्वितीय वर्षात शिकत होती. बुधवारी रात्री महाविद्यालयातून वसतिगृहात परतल्यानंतर तिने  रात्रीचे जेवण केले. त्यानंतर ती काही वेळ कोणाशी तरी मोबाईल बोलत होती. त्यानंतर तिने एका खोलीत जाऊन  गळफास लावून आत्महत्या केली. मात्र बराच वेळ होऊनदेखील ती झोपण्यासाठी खोलीत न आल्याने तिच्या मैत्रिणींनी तिला अनेकदा आवाज दिला तसेच दरवाजादेखील उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ती दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी याची माहिती चेंबूर पोलिसांना दिली. त्यानुसार चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरवाजा उघडला असता तिने पंख्याला गळफास घेतलेला आढळून आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;