नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी

नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी

खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विधानसभेबरोबरच येथे लोकसभेसाठीही २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांंदेड मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा दारुण पराभव केला. मात्र निकालानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांची प्रकृती ढासळली आणि हैदराबादेत उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसने त्यांचे पुत्र रवींद्र यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

इम्तियाज जलील नांदेडातून उभे राहणार

मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीनचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले आहेत. जलील यांची उमेदवारी ही काँग्रेसला मिळणार्‍या मतांची विभागणी करण्यासाठी भाजपने केलेली कुटील खेळी असल्याचे बोलले जात आहे. मुळात एखाद्या लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर त्याच्या वारसाला बिनविरोध निवडून देण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. मात्र जलील यांच्याकडून भाजपसाठी या प्रथेला हरताळ फासण्यात येत असल्याची चर्चा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;