तमन्ना भाटिया हिच्या अडचणीत मोठी वाढ, अभिनेत्रीला थेट…

तमन्ना भाटिया हिच्या अडचणीत मोठी वाढ, अभिनेत्रीला थेट…

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवलाय. अभिनेत्रीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगही बघायला मिळते. तमन्ना भाटिया हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच तमन्ना भाटिया हिला ईडीकडून समन्स पाठवण्यात आला. ज्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आलीये. तमन्ना भाटियाची गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. यावेळी अभिनेत्री ही तिच्या आईसोबत ईडी कार्यालयात पोहोचली. 

रिपोर्टनुसार, HPZ ॲपवर इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सामने बेकायदेशीरपणे पाहण्याचा प्रचार केल्याच्या आरोपावरून तमन्नाला ईडीने समन्स पाठवले होते. अभिनेत्री ॲपला प्रमोट करत होती. तमन्ना भाटियाने हिने HPZ ॲपवर IPL पाहण्याची जाहिरात केली होती. ‘स्त्री 2’ देखील अभिनेत्री दिसली आहे. 

आज दुपारी अभिनेत्री ईडी कार्यालयात पोहोचली होती. काही तास अभिनेत्रीची चाैकशी करण्यात आली. हेच नाही तर या प्रकरणात ईडीकडून आतापर्यंत 497.20 कोटी रुपयांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आलीये. HPZ मुळात एक बेटिंग ॲप आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे गेम आहेत.

या ॲपच्या माध्यमातून 57 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी दररोज 4 हजार रुपये देण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हैराण करणारे म्हणजे या फसवणुकीसाठी कंपन्यांच्या नावाने वेगवेगळ्या बँकांमध्ये बनावट खाती उघडून गुंतवणूकदारांकडून पैसे हस्तांतरित करण्यात आले. आरोपींनी हे पैसे क्रिप्टो आणि बिटकॉइन्समध्ये गुंतवले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;