तानाजी सावंतांच्या सुरक्षारक्षकाचा हलगर्जीपणा, बंदुकीतून गोळी सुटल्याने 13 वर्षांचा मुलगा जखमी

तानाजी सावंतांच्या सुरक्षारक्षकाचा हलगर्जीपणा, बंदुकीतून गोळी सुटल्याने 13 वर्षांचा मुलगा जखमी

मिंधे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षारक्षकाने केलेल्या हलगर्जीपणामुळे त्याच्याच 13 वर्षांच्या मुलाच्या पायात गोळी लागली आहे. त्यामुळे मुलगा जबर जखमी झाला असून त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळाळलेल्या माहितीनुसार, तानाजी सावंत यांचे सुरक्षारक्षक नितीन शिर्के धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. नितीन शिर्के याच्याकडे बंदुकीचा परवाना आहे. त्यांनी बंदुकीमध्ये गोळ्या भरून बंदुक बॅगेत आणि बॅग घरातील कपाटात ठेवली होती. याच दरम्यान, मुलाने कपडे घालण्यासाठी कपाट उघडले असता बॅग खाली पडली व बंदुकीतून गोळी सुटून 13 वर्षांच्या अभय शिर्के याच्या उजव्या पायाच्या पोटरीला लागली. त्यामुळे त्याच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सदर घटना नितीन शिर्के यांच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे. त्यामुळे पोलिसांनी नितीन शिर्के यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;