बदलापूरच्या आरोपीचे एन्काऊंटर मग ठाण्याचा तुमचा उपविभागप्रमुख मोकाट कसा? मिंधे विरोधात ठाणेकरांचा जनआक्रोश

बदलापूरच्या आरोपीचे एन्काऊंटर मग ठाण्याचा तुमचा उपविभागप्रमुख मोकाट कसा? मिंधे विरोधात ठाणेकरांचा जनआक्रोश

नवरात्रोत्सवात सर्वत्र जगदंबेचा जागर सुरू असतानाच मिंधे गटाच्या उपविभागप्रमुखाने ठाण्यातील अकरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केला. संतापजनक म्हणजे या प्रकरणात अटक झाल्यानंतर नराधम सचिन यादव हा काही तासांतच जामिनावर सुटला असून तो मोकाट फिरत आहे. या विरोधात आज ठाण्यातील जनतेने रस्त्यावर उतरत आंदोलन केले. ‘बदलापूरच्या आरोपीचे एन्काऊंटर मग ठाण्याचा तुमचा उपविभागप्रमुख मोकाट कसा?’, असा सवाल संतप्त ठाणेकरांनी मिंधे सरकारला केला.

गुरुवारी संध्याकाळी संतप्त ठाणेकरांनी रस्त्यावर उतरून मिंधे सरकारला जाब विचारला. हजारो ठाणेकर हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले होते.   एकीकडे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या उपविभागप्रमुखाला वेगळा न्याय का, असा सवाल आंदोलकांनी विचारला आहे. तर बहिणीला अनुदान आणि बालिकेवर अत्याचार हाच का तुमचा कायदा आहे का? असे देखील ठाणेकरांनी मिंधे सरकारला विचारले आहे.

ठाण्याच्या स्टेशन परिसरातील भंडार आळीत राहणारी चिमुकली शुक्रवारी दुपारी ट्युशनला जात होती. तेव्हा मिंधे गटाचा उपविभागप्रमुख सचिन यादव (55) याने त्या मुलीला इमारतीमध्ये गाठत विनयभंग केला. त्यावेळी घाबरलेल्या पीडित तरुणीने त्या नराधमाला लांब ढकलले. त्यावेळी यादव याने अश्लील कृत्य केले. पीडित तरुणीने आपल्यासोबत झालेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी थेट ठाणे नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटकदेखील केली. मात्र दुसऱ्या दिवशी त्याला जामीन मिळाला. पोलिसांवरील राजकीय दबावामुळेच थातूरमातूर कलमे लावल्याने यादवला जामीन मिळाल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणीदेखील होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;