Ratnagiri News – रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धा 20 ऑक्टोबरला, 200 स्पर्धक सहभागी होणार

Ratnagiri News – रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धा 20 ऑक्टोबरला, 200 स्पर्धक सहभागी होणार

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग दुसऱ्या वर्षी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन येत्या रविवारी दि.20 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. भाट्ये-गावखडी-भाट्ये या मार्गावर होणाऱ्या या स्पर्धेत देशाच्या विविध भागांतून दोनशे सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची पेडल फॉर बायोडायर्वर्सिटी अशी संकल्पना असून कोकण कनेक्ट मूव्हमेंटची सुरवात या स्पर्धेने होणार आहे. निवडणूक आयोगाच्या स्वीप या कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने केली जाणार आहे.

ही स्पर्धा सकाळी 6.30 वाजता भाट्ये येथून सुरू होणार आहे. कसोप, फणसोप, वायंगणी, गोळप, पावस, मेर्वी, गावखडी या मार्गावरून पुन्हा याच मार्गाने भाट्ये येथे स्पर्धा संपेल. साधारण 48 किलोमीटरचे हे अंतर असून यात राज्यभरातून नामवंत सायकलपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत पुरुष, महिलांचे वेगवेगळे गट केले असून यामध्ये जवळपास 1 लाख 10 हजारांची बक्षीसे, ट्रॉफी देण्यात येतील. जे सायकलिस्ट सायक्लोथॉन पूर्ण करतील त्यांना आकर्षक फिनिशर मेडल देऊन कौतुक करण्यात येणार आहे. 5 जानेवारीला सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन व मार्चमध्ये अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. रत्नागिरीमध्ये पर्यटन वाढले पाहिजे, याकरिता ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे पत्रकार परिषदेत स्पर्धेबाबत माहिती देण्यात आली. या स्पर्धेकरिता रोलर कोस्टर सायक्लोथॉन पॉवर्ड बाय हॉटेल विवेक या स्पर्धेसाठी सुवर्णसूर्य फाउंडेशन, लायन्स क्बब ऑफ रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंक, महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, भारत निवडणूक आयोग, जय हनुमान मित्रमंडळ, दीपक पवार यांच्याकडून विशेष मार्गदर्शन, सहकार्य लाभले आहे. स्पर्धेच्या मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ते सुस्थितीत ठेवण्याकरिता विशेष लक्ष दिले आहे. मार्गावरील सर्व ग्रामपंचायती व शाळांनी महत्त्वाचे सहकार्य केले आहे. रत्नागिरीकरांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून यावे, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे. यावेळी एसआर दर्शन जाधव, लोहपुरुष एसआर विनायक पावसकर, एसआर महेश सावंत, एसआर डॉ. नितीन सनगर, प्रसाद देवस्थळी, अॅड. सचिन नाचणकर, एसआर डॉ. राज कवडे, एसआर ओंकार फडके, योगेश मोरे उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;