माझ्या कुटुंबाला न्याय हवाय, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुत्र झिशान सिद्दीकीची पहिली प्रतिक्रिया

माझ्या कुटुंबाला न्याय हवाय, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुत्र झिशान सिद्दीकीची पहिली प्रतिक्रिया

माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तीन आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. माझ्या कुटुंबाला न्याय हवाय अशी पहिली प्रतिक्रिया बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबातून आली आहे.

आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दीकी यांनी एक्सवर पोस्ट लिहून म्हटले आहे की, बेघर आणि गरीबांचे रक्षण करताना माझ्या वडिलांनी जीव गमावला. माझं संपूर्ण कुटुंब कोसळलं आहे. पण माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण करू नका. त्यांचे हे बलिदान वाया जाणार नाही. मला न्याय हवाय माझ्या कुटुंबाला न्याय हवाय असे झिशान यांनी म्हटले आहे.

सलमानसोबत मैत्रीमुळे हत्या

बाबा सिद्दीकी यांचे सलमान खान सोबत मैत्रीपूर्व संबंध होते. त्यामुळेच बिष्णोई गँगने सिद्दीकी यांचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आता पोलिसांनी सलमान खानला झेड प्लस सुरक्षा बहाल केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;