लग्नाच्या बारा वर्षानंतर ‘ही’ अभिनेत्री होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गूड न्यूज

लग्नाच्या बारा वर्षानंतर ‘ही’ अभिनेत्री होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गूड न्यूज

अभिनेत्री राधिका आपटे लग्नाच्या बारा वर्षानंतर आई होणार आहे. नुकतेच तिने स्टायलिश अंदाजात बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर बेबी बंप फ्लॉन्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

राधिका लंडनच्या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर काळ्या रंगाच्या मिडी ड्रेसमध्ये दिसली. तिथे तिचा सिनेमा ‘सिस्टर मिडनाइट’ चा प्रिमिअर झाला. त्यावेळीच राधिकाने आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. ऑफ शोल्डर मिडी ड्रेसमध्ये राधिका अगदी लक्षवेधक ठरत होती. तिचा प्रेग्नेसी ग्लो चेहऱ्यावर दिसत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

राधिकाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिने फोटोंसोबत SISTER MIDNIGHT UK Premier अशी फोटोओळ लिहीली आहे.  मात्र बेबी बंपचे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या पोस्टवर भरभरुन शुभेच्छा दिल्या. शिवाय अभिनेते विजय वर्मा यांनी देखिल तिचे अभिनंदन केले. एका युजरने लिहीलेय की, ओह माय गॉड, ती प्रेग्नेंट आहे. किती चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या युजरने लिहीले की, प्रिमियर आणि प्रेग्नेसी दोन्हीसाठी अभिनंदन तर अन्य एका युजरने लिहीले की, ओह राधिका, तू कमालिची सुंदर दिसत आहेस. राधिका आपटेने 2012 मध्ये ब्रिटीश संगीतकार आणि कम्पोजर बेनेडिक्ट टेलर यांच्याशी लग्न केले आहे. हे जोडपं कधी मुंबई तर कधी लंडनमध्ये राहतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;