लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाली असतानाही सलमान खानने घेतला मोठा निर्णय

लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाली असतानाही सलमान खानने घेतला मोठा निर्णय

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली होती. 12 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला होता. बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे जवळचे मित्र होते. त्यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. कोणी सलमान खानशी संबंध ठेवेल तर त्यालाही असेच भोगावे लागेल अशी धमकी ही देण्यात आली होती. या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, या सगळ्यामध्ये अभिनेता सलमान खानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सलमान खान सध्या बिग बॉस 18 हा रिॲलिटी शो होस्ट करण्यात तसेच एआर मुरुगदास दिग्दर्शित सिकंदर या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रविवारी बाब सिद्दिकी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्याने सर्व शूट रद्द केले होते, त्यानंतर ही तो शूटिंग करणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. कारण त्याला धमकी मिळाली आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, शूटिंग रद्द केल्याची बातमी खरी नसल्याचे म्हटले आहे. अभिनेत्याची सुरक्षा सेटवर कडक करण्यात आली आहे. सलमान खान याच्या आसपास नेहमीच सुरक्षा होती, परंतु आता आणखी 8 ते 10 सुरक्षा रक्षक जोडले गेले आहेत. सलमान खान येण्याआधी ते आधी रेकीसाठी येतात.

सलमान खानने शुटिंग शेड्यूल 1-2 दिवसांनी पुढे ढकलले होते. परंतु त्याचा काही खास परिणाम होणार नाही. शूटिंग नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये संपेल असे अपेक्षित होते. आता ते जानेवारीपर्यंत जाईल. कारण सध्या सर्वांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. मुरुगादास यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचे शूटिंग पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. मुंबईतील एसआरपीएफ मैदानावर पुढील शुटिंग होणार आहे. सलमान खानच्या सुरक्षेचा विचार करून शूटिंगचे लोकेशन गुप्त ठेवण्यात येणार आहे. प्रोडक्शन टीमलाच याबाबत माहिती दिली जाणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, “आधी हैदराबादमध्ये हे शूट होणार होते. पण आता मुंबईत सर्व शुट होणार असल्याचे बोलले जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;