‘कोकण हार्टेड गर्ल’च्या लग्नात आहेर काय देणार? डीपी दादा म्हणाला, “ती जरा आगाऊ..”
'बिग बॉस मराठी 5' फेम अंकिता वालावलकर ऊर्फ 'कोकण हार्टेड गर्ल' लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्रियकरासोबतचा फोटो पोस्ट करत तिने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. आता अंकिताच्या लग्नाबाबत धनंजय पोवार ऊर्फ डीपी दादाने प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉसच्या घरातील अंकिता आणि डीपी दादाची मैत्री चांगलीच गाजली होती. हे दोघं एकमेकांना बहीण-भाऊ मानतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धनंजयला अंकिताच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. "अंकिताला लग्नात आहेर काय देणार", असा प्रश्न डीपीला विचारण्यात आला होता.
यावर डीपीनेही त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं. "अंकिताला आहेर काय द्यायचा? ती दिसते तशी नाही, ती जरा आगाऊ आहे. माझ्याकडे ती सोफा, पाटी असं काहीतरी मागेल. साडी देऊन सात-आठ हजारांमध्ये भागवण्यासारखं मला वाटत नाही", असं तो म्हणाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List