नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविंद्र चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर

नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविंद्र चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातील लोकसभेच्या नांदेड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीही घोषणा निवडणूक आयोगाने केली. 15 ऑक्टोबरला निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने दोनच दिवसांत नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे दिवंगत खासादर वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रविंद्र चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.

पोटनिवडणुकीसाठी जारी केलेल्या उमेदवारांच्या यादीत नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने रविंद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच म्हणजे 20 नोव्हेंबरला नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. आणि 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे निवडून आले. लोकसभा निवडणुकीचा निकाल जून महिन्यात लागला. आणि त्याच्या दोन महिन्यांनी म्हणजे 26 ऑगस्टला खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती.

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक

> निवडणूक अधिसूचना – 22 ऑक्टोबर 2024

> उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर

> उमेदवारी अर्ज पडताळणी तारीख – 30 ऑक्टोबर 2024

> उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2024

> मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर 2024

> निकाल – 23 नोव्हेंबर 2024

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;