आमिर खानच्या लेकीची ‘ती’ पोस्ट व्हायरस, इराने पती नुपूर शिखरेसाठी…

आमिर खानच्या लेकीची ‘ती’ पोस्ट व्हायरस, इराने पती नुपूर शिखरेसाठी…

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. आमिर खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आमिर खान याचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, त्याच्या या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. आमिर खानची लेक इरा खान हिने काही दिवसांपूर्वीच नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे लेकीच्या लग्नात धमाल करताना आमिर खान हा दिसला. इरा खान हिने काही दिवस नुपूर शिखरे याला डेट केले आणि मग त्याच्यासोबत लग्न केले. नुपूर आणि इरा खान यांचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

आता नुकताच आमिर खान याच्या लेकीने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. आमिर खानचा जावई नुपूर शिखरे याचा आज वाढदिवस आहे. पतीच्या वाढदिवसानिमित्त इरा हिने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. आता इरा खान हिची ही पोस्ट व्हायरल होत आहे. अनेकजण या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत.

इरा खान हिने लिहिले की, तू माझ्या आयुष्यातील सर्वात आवडती गोष्ट आहेस निर्णय आणि अनुभव … सर्व काही, तू मला हसवतोस, तू मला धरून ठेवतोस, तू मला समजावतोस. काळजी म्हणजे काय हे तू मला आठवण करून देतोस आणि तू अशी जागा तयार करतोस जिथे मी निश्चिंत राहू शकते. वाढदिवसाच्या शुभेच्छा…

या पोस्टसोबतच इरा खान हिने अनेक फोटो नुपूर शिखरे याच्यासोबतचे शेअर केले आहेत. दोघेही फोटोंमध्ये एकदम आनंदात दिसत आहेत. आता इरा खान हिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इरा खान ही सोशल मीडियावर कायमच नुपूर शिखरे याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

लग्नाच्या अगोदरही तिने नुपूर शिखरे याच्यासोबत बिकिनीवरील एक फोटो शेअर केला होता. ज्यानंतर तिच्यावर जोरदार टीका ही करण्यात आली होती. 3 जानेवारी 2024 रोजी नुपूर आणि इरा यांनी कोर्ट मॅरेज केले. 10 जानेवारीला त्यांनी उदयपूरमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. इरा खान ही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणार नाहीये. 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;