सलमान खानच्या सुरक्षेसाठी सरकारकडून किती पैसा खर्च केला जातो?

सलमान खानच्या सुरक्षेसाठी सरकारकडून किती पैसा खर्च केला जातो?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानला वाय प्लस (Y+) सुरक्षा पुरविण्यात आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या गँगकडून सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली. ‘जो कोणी सलमान खान आणि दाऊदची मदत करणार, त्याला आपला हिशोब तयार ठेवावा लागेल’, अशी धमकी बिष्णोईकडून फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली होती. यानंतर सलमान आणि त्याच्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षेवर किती पैसे खर्च केले जातात याचा हिशोब थक्क करणार आहे.

सुरक्षेचे प्रकार

सुरक्षेचे प्रामुख्याने सहा प्रकार आहेत. यात X, Y, Y+, Z, Z+ आणि SPG (विशेष संरक्षण गट) यांचा समावेश होतो. पंतप्रधान आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीची आहे. सरकार कोणत्याही व्यक्तीला अतिरिक्त सुरक्षा देऊ शकते. X श्रेणीतील लोकांच्या सुरक्षाव्यवस्थेत एक बंदुकधारी तर Y श्रेणीतील लोकांच्या सुरक्षाव्यवस्थेत दोन बंदुकधाऱ्यांचा समावेश असतो. Y+ श्रेणीअंतर्गत दोन पोलीस अधिकारी आणि एक घराच्या सुरक्षेसाठी असतो. दुसरीकडे Z सेक्युरिटीमध्ये सहा बंदुकधाऱ्यांचा समावेश असतो. तर दोन घराच्या सुरक्षेसाठी असतात. Z+ सिक्युरिटीमध्ये 10 सुरक्षारक्षक आणि घराबाहेर दोन सुरक्षारक्षक असतात.

सलमानच्या सुरक्षेवरील खर्च

‘एबीपी लाइव्ह’ने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खानच्या सुरक्षेवर होणारा खर्च हा कोट्यवधींमध्ये आहे. वाय प्लस सिक्युरिटीसाठी जवळपास तीन कोटी रुपये खर्च होतात. एप्रिल महिन्यात सलमानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर गोळीबार झाला होता. तेव्हापासूनच त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे.

अरबाज खानची प्रतिक्रिया

या घटनेनंतर सलमानचा भाऊ अरबाज खान याने ‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, “आम्ही ठीक आहोत. आम्ही पूर्णपणे ठीक आहोत असं मी म्हणणार नाही. कारण सध्या कुटुंबात बऱ्याच गोष्टी घडत आहेत. अर्थातच प्रत्येकजण चिंतेत आहे. सध्याच्या घडीला आम्ही काय करू शकतो, ते करण्याचा प्रयत्न करत आहोत. सलमानच्या सुरक्षेसाठी सर्व पावलं उचलली जात आहेत. प्रत्येकजण सर्वतोपरी प्रयत्न करतोय. सध्यातरी आम्हाला असंच राहावं लागेल.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;