“माझ्या आईबहिणीचा अपमान, मुलांना भेटू दिलं नाही..”; अमृतासोबत घटस्फोटानंतर सैफने व्यक्त केलं होतं दु:ख

“माझ्या आईबहिणीचा अपमान, मुलांना भेटू दिलं नाही..”; अमृतासोबत घटस्फोटानंतर सैफने व्यक्त केलं होतं दु:ख

अभिनेता सैफ अली खानने वयाच्या 21 व्या वर्षी अभिनेत्री अमृता सिंहशी लग्न केलं होतं. अमृता सैफपेक्षा वयाने सहा वर्षांनी मोठी आहे. 1991 मध्ये या दोघांनी लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. मात्र लग्नाच्या 13 वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. घटस्फोटानंतर सैफ एका मुलाखतीत पोटगीच्या विषयावर मोकळेपणे व्यक्त झाला होता. तो म्हणाला कमावलेला सर्व पैसा त्याच्या मुलांसाठी पाठवला जात होता. इतकंच नव्हे तर मला घरातून काढून टाकण्यात आलं होतं, असाही आरोप त्याने केला होता. त्या घरात अमृता आणि तिचे नातेवाईक राहू लागले होते.

2005 मध्ये ‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, “मला पोटगी म्हणून अमृताला पाच कोटी रुपये द्यायचे आहेत. त्यापैकी अर्धे म्हणजेच अडीच कोटी रुपयांपर्यंत मी तिला आधीच दिले आहेत. त्याचसोबत माझा मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत त्याला दर महिन्याला एक लाख रुपये द्यायचे आहेत. मी शाहरुख खान नाहीये. माझ्याकडे एवढा पैसाही नाही. उरलेले पैसे मी नक्की देईन, असं तिला वचन दिलं आहे. त्यासाठी मला मरेपर्यंत कष्ट करावे लागले तरी चालेल. जाहिराती, स्टेज शोज आणि चित्रपट यांमधून मी जो काही पैसा कमवत होतो, ते सर्व माझ्या मुलांना देतोय. माझ्याकडे काहीच पैसा शिल्लक राहत नाही. आमचा बंगला हा अमृता आणि मुलांसाठी आहे. त्यात मी गेल्यानंतर तिचे नातेवाईकसुद्धा राहू लागले आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

मी किती वाईट पती आणि किती वाईट पिता आहे यावरून मला सतत टोमणे मारले जात होते, असंही सैफ म्हणाला होता. “मी माझ्या मुलांना भेटू शकत नाही. त्यांनाही मला भेटण्याची, माझ्यासोबत राहण्याची परवानगी नव्हती. माझ्या वॉलेटमध्ये मुलगा इब्राहिमचा फोटो आहे. जेव्हा जेव्हा मी तो फोटो पाहतो, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू येतात. मला प्रत्येक वेळी मुलगी साराची आठवण येते”, अशा शब्दांत त्याने दु:ख व्यक्त केलं होतं.

“मी किती नालायक आहे, हा टोमणा मला सतत ऐकावा लागतोय. सतत असा अपमान सहन करणं सोपं नाही. तुमच्या आई आणि बहिणीचाही अपमान केला जातो. मी या सर्वांमधून गेलोय”, असं सैफ म्हणाला होता. अमृतासोबत सैफच्या लग्नाला त्याची आई शर्मिला टागोर यांचा स्पष्ट विरोध होता. त्यामुळे जेव्हा सैफने लग्नाविषयी सांगितलं, तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;