श्रीरामपुरात अल्पवयीन मुलावर अत्याचार
श्रीरामपूर शहरात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. नऊजणांनी मिळून या अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केले असून, अत्याचार करणारेदेखील अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यात बाल लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन व महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीरामपुरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. 11 वर्षीय अल्पवयीन मुलास धमकावून हा अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List