सलमानच्या हत्येचा कट रचणाऱ्या बिष्णोई गँगच्या शूटरला अटक

सलमानच्या हत्येचा कट रचणाऱ्या बिष्णोई गँगच्या शूटरला अटक

अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी सुखा नावाच्या आरोपीला अटक केली आहे. सुखाला हरयाणामधील पानिपत इथून अटक केल्याच्या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. नवी मुंबई पोलिसांनी हरयाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत फरार आरोपीला अटक केली. त्याला नवी मुंबईत आणल्यानंतर आज (गुरुवार) कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. सुखा हा बिष्णोई गँगचा शूटर असल्याचं समजतंय. सलमानला त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसजवळ टारगेट करण्याचा आरोपीचा प्लॅन पोलिसांना जून महिन्यात समजला होता. त्याआधी एप्रिल महिन्यात सलमानच्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन आरोपींनी गोळीबार केला होता. या गोळीबाराच्या घटनेमागे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या गँगचा हात असल्याचा संशय सलमानने पोलिसांसमोर व्यक्त केला होता. बिष्णोई गँगकडून सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी कोर्टात जे चार्जशीट दाखल केलं होतं, त्यात सलमानच्या जबाबाचाही समावेश होता. सलमाने असंही म्हटलं होतं की जानेवारीमध्ये दोन अनोळखी लोकांनी बनावट ओळखपत्र दाखवून त्याच्या पनवेल फार्महाऊसमध्ये शिरकाव करण्याचाही प्रयत्न केला होता. 2022 मध्ये सलमानच्या वांद्रे इथल्या इमारतीबाहेर धमकीचं पत्र आढळून आलं होतं. तर मार्च 2023 मध्ये ई-मेलद्वारे सलमानला लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

सलमान खानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लॉरेन्स बिष्णोई आणि संपत नेहरा गँगने जवळपास 60 ते 70 लोकांना नेमण्यात आल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. सलमानच्या वांद्रे इथल्या घरावर, पनवेल फार्महाऊसवर आणि फिल्म सेट्सवर त्यांची नजर होती. याबाबत ठराविक माहिती मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात 24 एप्रिल रोजी काही जणांविरोधात केस दाखल करण्यात आली होती.

एप्रिल महिन्यात सलमानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर दोन जणांनी गोळीबार केला होता. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नव्हती. सलमानच्या घरातील बाल्कनीच्या भिंतीला गोळी लागली होती. या घटनेनंतर आणि आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;