राधिका आपटेनं दिली ‘गुड न्यूज’; केवळ व्हिसासाठी लग्न केल्याचा केला होता खुलासा
अभिनेत्री राधिका आपटेनं सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. 'बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल 2024'मधील फोटो पोस्ट करत राधिकाने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये राधिकाचे फोटो क्लिक करण्यात आले असून त्यात तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळतोय.
राधिकाच्या आगामी 'सिस्टर मिडनाइट' या चित्रपटाचं युकेमध्ये प्रीमिअर पार पडलं. यावेळी तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. राधिकाने हे फोटो पोस्ट करताच त्यावर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
राधिकाने 2012 मध्ये ब्रिटीश व्हायोलियनिस्ट आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. नॉर्थन इंग्लंडमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी हे लग्न केलं होतं. राधिका तिच्या खासगी आयुष्याविषयी सोशल मीडियावर किंवा माध्यमांसमोर फारशी व्यक्त होत नाही.
'इंडिया टुडे डिजिटल'ला दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने सांगितलं होतं की ती आणि बेनेडिक्ट त्यांच्या लग्नात फोटो क्लिक करायलाच विसरून गेले होते. "जेव्हा मी आणि बेनेडिक्टने 10 वर्षांपूर्वी लग्न केलं, तेव्हा आम्ही फोटो काढायलाच विसरलो होतो. आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना बोलावलं, जेवणसुद्धा आम्हीच बनवलं होतं आणि लग्नानंतर एकत्र पार्टी केली. आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये अनेकजण फोटोग्राफर्स असूनही कोणीच आमचे फोटो काढले नाहीत. आम्हीसुद्धा फोटो काढायला विसरून गेलो", असं ती म्हणाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List