Pune fire news – घोरपडे पेठेत भीषण आग; 5 घरं, दुकान जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

Pune fire news – घोरपडे पेठेत भीषण आग; 5 घरं, दुकान जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

गुरुवारी पहाटे पुण्यातील घोरपडे पेठेत अग्नितांडव पहायला मिळाला. पहाटे साडे तीनच्या सुमारास पंचहौद टॉवरजवळील जोशी वाड्यात भीषण आग लागली. या आगीमध्ये वाड्यातील 5 घरं आणि एक छोटे दुकान जळून खाक झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजून 47 मिनिटांनी जोशी वाड्याला आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.

सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही जीवितहानीचे वृत्त समोर आलेले नाही. मात्र आगीमध्ये पाच घरं आणि एक छोटे दुकान जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतू शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;