मोलकरणीने केली हातसफाई 

मोलकरणीने केली हातसफाई 

मोलकरणीने हातसफाई करून पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. कांदिवली येथे राहणारे तक्रारदाराच्या घरी कामासाठी दोन महिला नोकर आहेत. एक महिला नोकर जेवण तर दुसरी ही साफसफाईचे काम करते. गेल्या आठवडय़ात दुसऱ्या मोलकरणीने गावी आईवडिलांचा वाद सुरू आहे. कोर्टात केस सुरू आहे असे सांगून ती निघून गेली.

दसऱ्याला तक्रारदार यांच्या पत्नीला साडी घालायची होती, मात्र त्यांना ती साडी मिळाली नाही. त्यामुळे तक्रारदार यांच्या पत्नीने त्या मोलकरणीला फोन करून विचारणा केली. तिने साडी माहीत नसल्याचे सांगून फोन कट केला. हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा ती मोलकरीण ही तक्रारदार यांच्या पत्नीच्या बॅगमधून काही सामान नेत असल्याचे फुटेजमध्ये दिसले.  त्यानंतर त्यांनी घरातील वस्तूची तपासणी केली तेव्हा घरातून कुंदन सेट, डायमंडच्या बांगडय़ा, घडय़ाळ आणि दोन लाख रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;