ईडीकडून मंगलदास बांदल यांच्यासह तिघांची 85 कोटींची संपत्ती जप्त

ईडीकडून मंगलदास बांदल यांच्यासह तिघांची 85 कोटींची संपत्ती जप्त

बेकायदा आर्थिक व्यवहार आणि शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल आणि संबंधितांची 85 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. यामध्ये पुणे, सोलापूर, नगर येथील संपत्तीचा समावेश आहे.

सक्तवसुली संचालनालयाने  ऑगस्ट महिन्यात बांदल यांच्या घरी छापा टाकून घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी ईडीला पाच कोटी 60 लाखांची रोकड, एक कोटीची चार घडय़ाळे आढळली होती. जवळपास 16 तासांच्या चौकशीनंतर ईडीने बांदल यांना अटक केली होती. दरम्यान, आता शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेड प्रकरणाशी संबंधित बांदल यांच्यासह हनुमंत खेमढारे, सतीश जाधव आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पुणे, सोलापूर आणि नगरमधील स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात असलेली अंदाजे 85 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;