केंद्रीय कर्मचार्‍यांची दिवाळी… महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला, जुलैपासूनची थकबाकीही मिळणार

केंद्रीय कर्मचार्‍यांची दिवाळी… महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला, जुलैपासूनची थकबाकीही मिळणार

केंद्र सरकारने दिवाळीअगोदरच आपल्या कर्मचार्‍यांना भेट दिली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. हा महागाई भत्ता १ जुलै पासून लागू होणार असून तेव्हापासूनची थकबाकीही कर्मचार्‍यांना देण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता तीन टक्के वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळतो. तो आता वाढून 53 टक्के होणार आहे. या निर्णयाचा लाभ निवृत्तीधारकांनाही होणार आहे. शासकीय कर्मचार्‍यांना देण्यात येणार्‍या महागाई भत्त्यांमध्ये वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येते. जानेवारी आणि जुलैमध्ये हा भत्ता वाढवून मिळतो.

सहा पिकांच्या हमीभावात वाढ
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू, मोहरी, जवस, हरभरा तसेच मसूर आणि करडईच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. गव्हाच्या हमीभावात 150 रुपयांची वाढ करण्यात आली असून तो आता 2475 रुपये असेल. मोहरीच्या भावात 300 रुपये तर जवसाच्या हमीभावात 130 रुपये वाढ करण्यात आली आहे. हरभर्‍याचा हमीभाव 210 रुपयांनी वाढवण्यात आला असून मसूर 275 तर करडईच्या हमीभावात 140 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;