नराधम बापाकडून पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोलिसांकडून अटक
बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर तीन वेळा बलात्कार केला आहे. हिंगोलीत ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी नराधम बापाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोलीत एका व्यक्तीला दारू पिण्याचे व्यसन होते. दारुच्या नशेत या नराधम बापाने आपल्याच 14 वर्षांच्या मुलीवर तीन वेळा बलात्कार केला. इतकंच नाही तर घरी कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकीही दिली. आधी मुलगी खुप घाबरली होती. घरी कुणालाही न सांगता तिने पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना झाली हकीगत सांगितली.
पोलिसांनी तातडीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपी वडिलांना अटक केली.
पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले असून ती सध्या खुप घाबरलेली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List