पाणी जपून वापरा, मुंबईत दोन दिवस 10 टक्के पाणी कपात

पाणी जपून वापरा, मुंबईत दोन दिवस 10 टक्के पाणी कपात

मुंबईला पाणीपुरवठा होणार्‍या वैतरणा जलवाहिनीच्या 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाल्यामुळे संपूर्ण मुंबईत उद्या गुरुवार 17 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर रोजी 5 ते 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि पाण्याचा साठा करून ठेवावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबई शहर व उपनगरास मुख्यत्वे वैतरणा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणामधून पाणी वाहून नेणार्‍या वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमधील ताराळी (जिल्हा ठाणे) येथे  900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी, मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात (मुंबई शहर व उपनगर) पाणी पुरवठा करणार्‍या भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणार्‍या पाणीपुरवठयामध्ये 5 ते 10 टक्के घट होणार आहे. या दुरुस्ती कामासाठी सुमारे 48 तास इतका कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दोन दिवस 5 ते 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;