Bhool Bhulaiyaa 3 – ‘हरे राम हरे राम’ गाण्यात दिलजीत-पिटबुलचा अनोखा स्वॅग, तर कार्तिकचा भन्नाट डान्स

Bhool Bhulaiyaa 3 – ‘हरे राम हरे राम’ गाण्यात दिलजीत-पिटबुलचा अनोखा स्वॅग, तर कार्तिकचा भन्नाट डान्स

अक्षय कुमारचा सिनेमा ‘भूल भुलैया’ 2007मध्ये टायटल ट्रॅक येताच म्युझिक चॅनलवर चांगलेच गाजले होते. त्यावेळी प्रत्येकाच्या हातात युट्युब आणि फोनमध्ये म्युझिक अॅप्स आजच्या सारखे पॉप्युलर नव्हते. आता गाणे ऐकण्याचा अनुभव पूर्णपणे बदलला आहे, मात्र या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे.

‘भूल भुलैया 3’ थिएटर्समध्ये प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे आणि कार्तिक आर्यन असलेल्या या सिनेमाचा टायटल ट्रॅक आला आहे. प्रीतम यांनी कंपोज केलेले गाणे यावेळीही हटके झाले आहे. गायक नीरज श्रीधरच्या आवाजासोबत यावेळी गाण्यात दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय कलाकारांची एण्ट्री झाली आहे. यावेळी ‘भूल भुलैया 3’ च्या मूळ गाण्याला नीरज श्रीधर तसेच हिंदुस्थानचा स्वतःचा आंतरराष्ट्रीय संगीतकार दिलजीत दोसांझचा आवाज आहे आणि ‘मिस्टर वर्ल्डवाइड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅपर पिटबुलने या गाण्यात रॅप केला आहे.

गाणे सुरु होताच क्षणी ‘भूल भुलैया’ च्या आयकॉनिक बीट्स ऐकू येतात. आपल्या रॅपमध्ये दिल्लीपासून पुण्यापर्यंत हॅण्ड्स अप करुन थिरकण्यासाठी पिटबुल याचा रॅप मजेदार वाटेल आणि त्यानंतर दिलजीत दोसांझच्या आवाजाने सहज थिरकायला होणार आहे. कार्तिक आर्यनने यावेळी भन्नाट डान्स केला आहे. ‘भूल भुलैया 3’ ट्रेलर प्रेक्षकांना मनोरंजक आहे. यावेळी सिनेमामध्ये कार्तिकसोबत विद्या बालन आपल्या मंजुलिका अवतारात पुन्हा दिसणार आहे. या दोघांसोबत माधुरी दिक्षित आणि तृप्ती डिमरीही दिसणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;