Ashes Series 2025-26 – ‘या’ दिवसापासून सुरू होणार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया संघांमध्ये तुंबळ युद्ध, वेळापत्रक जाहीर

Ashes Series 2025-26 – ‘या’  दिवसापासून सुरू होणार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया संघांमध्ये तुंबळ युद्ध, वेळापत्रक जाहीर

क्रिकेटप्रेमी ज्या कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहतात अशा नामांकीत आणि सर्वात जुन्या Ashes Series चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 21 नोव्हेंबर 2025 पासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये द्वंद्वाला सुरुवात होईल. विशेष म्हणजे 43 वर्षांत पहिल्यांदाच अ‍ॅशेस मालिकेची सुरुवात पर्थमधून होणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 21 नोव्हेंबर 2025 पासून 5 सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना पर्थमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना 4 ते 8 डिसेंबर या कालावधीत ब्रिस्बेन (दिवस-रात्र), तिसरा सामना 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत अ‍ॅडिलेड, चौथा कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर मेलबर्न आणि पाचवा कसोटी सामना 4 ते 8 जानेवारी 2026 सिडनीमध्ये खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने 2010-11 नंतर ऑस्ट्रेलियामध्ये कोणतीही मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे इंग्लंड ऑस्ट्रेलियाला पराभुत करून मालिका विजय साजरा करण्यासाठी आतुर असेल. ऑस्ट्रेलिया सुद्धा चांगल्या फॉर्मात आहे त्यामुळे दोन्ही संघांमध्ये तुंबळ युद्धाची रोमांचक लढाई चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;