न्यायालयात अपील करण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाहीत, बायकोचा बंदूकीची गोळी घालून खून
न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी पत्नीने माहेरून पैसे आणले नाहीत. या कारणासाठी उदगीर येथे थेट बायकोचा बंदुकीची गोळी घालून खून करण्यात आल्याची घटना घडली.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सोनू ऊर्फ अमित नाटकरे रा. समता नगर उदगीर याने त्याच्या बायकोला न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी माहेर वरुन पैसे घेऊन ये असे सांगितले होते. परंतु तिने पैसे आणले नाहीत म्हणून भाग्यश्री सोनू उर्फ अमित नाटकरे, हिला बंदूकीतील गोळ्या घालून जिवानिशी ठार मारुन तिचा खून केला. बायकोला गोळ्या घालून खून केल्या नंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. भिमराव शिवराज बिरादार यांचे घरी समता नगर, शाहू चौक उदगीर येथे तो राहातं होता. चंद्रकांत विनायक गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सोनू उर्फ अमित नाटकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे यांचेकडे देण्यात आला आहे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List