Baba Siddique – सलमान खानसोबतच्या मैत्रीमुळेच बाबा सिद्दीकी यांची हत्या, मुंबई पोलिसांची माहिती

Baba Siddique – सलमान खानसोबतच्या मैत्रीमुळेच बाबा सिद्दीकी यांची हत्या, मुंबई पोलिसांची माहिती

माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्र्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अभिनेता सलमान खानसोबतच्या मैत्रीमुळेच सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सलमान खानने काळवीटांची शिकार केली होती. तेव्हापासून सलमान खान बिष्णोई गँगच्या हिटलिस्टवर आहे.

मिड डे या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. जो कोणी सलमान खानसोबत मैत्रीपूर्वक आर्थिक संबंध ठेवेल त्याची अशीच अवस्था केली जाईल अशा इशाराच बिष्णोई गँगने दिला आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

पंजाबी गायक एपी ढिल्लोन याच्या कॅनडातील घरावरही गोळीबार झाला होता. ढिल्लॉन सलमान खान सोबत गाणं करणार होता. म्हणून बिष्णोई गँगने ढिल्लॉनला लक्ष्य केलं होतं. गायक ढिल्लॉनच्या घरावर हल्ला, सलमान खानच्या घरावर हल्ला आणि आता बाबा सिद्दीकी यांची हत्या. हे सर्व हल्ले बिष्णोई गँगने केले आहेत याचा पोलीस तपास करत आहेत. सलमान खानच्या जवळ जो कोणी असेल बिष्णोई गँग त्यांना लक्ष्य करत आहेत असे वरकरणी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आम्ही आधी एसआरए आणि व्यावसायिक उद्देशातून हा खून झाला का याचा तपास करत होतो अशी माहिती पोलिसांनी दिली. पण आम्ही 70 टक्के खात्रीने सांगू शकतो की सलमान खानसोबतच्या मैत्रीमुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;