हेमा मालिनींसोबत दुसरं लग्न, तरीही 26 वर्ष लहान अभिनेत्रीवर जडला धर्मेंद्र यांचा जीव

हेमा मालिनींसोबत दुसरं लग्न, तरीही 26 वर्ष लहान अभिनेत्रीवर जडला धर्मेंद्र यांचा जीव

Hema Malini – Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. आज धर्मेंद्र बॉलिवूड पासून दूर त्यांच्या खासगी आयुष्याचा आनंद घेत आहे. धर्मेंद्र कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो व्हिडीओ पोस्ट करत असतात. पण एक काळ असा देखील होता जेव्हा धर्मेंद्र वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आले. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना चार मुल देखील आहे.

पत्नी, चार मुलं असा संसार असताना धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केलं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नामुळे सर्वत्र खळबळ माजली. हेमा मालिनी यांच्या कुटुंबियांना देखील दोघांचं लग्न मान्य नव्हतं. लग्नानंतर हेमा मालिनी सासारी देखील गेल्या नाहीत.

रिपोर्टनुसार, हेमा मालिनी यांच्यासोबत संसार थाटल्यानंतर देखील धर्मेंद्र यांचा जीव स्वतःपेक्षा 26 वर्ष लहान अभिनेत्रीवर जडला होता. हेमा मालिनी यांच्यानंतर धर्मेंद्र यांचं नाव अनिता राज यांच्यासोबत जोडण्यात आलं. अनिता राज यांनी ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘अच्छा बुरा’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अनिता राज आणि धर्मेंद्र यांनी ‘नौकर बीवी का’,’जलजला’ आणि ‘करिश्मा कुदरत का’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. मीडियारिपोर्टनुसार , सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अनिता राज आणि धर्मेंद्र यांच्यात प्रेम बहरलं. जेव्हा या गोष्टीबद्दल हेमा मालिनी यांना कळालं तेव्हा धर्मेंद्र यांनी अनिता यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर अनिता राज हिने छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला. छोट्या पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर अनिता राज यांनी 1986 साली निर्माते सुनील हिंगोरानी यांच्यासोबत लग्न केलं. अनिता राज आणि सुनील हिंगोरानी यांना शिवम नावाचा एक मुलगा देखील आहे. हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;