या अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, तिच्यासाठी निर्मात्याची केली होती हत्या!
बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमध्ये एकेकाळी खूप जवळचे नाते होते. अनेक कलाकारांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. मात्र या संबंधांमुळे त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला. अंडरवर्ल्डशी मैत्री अनेक सेलिब्रिटींना महागात पडली. अशाच प्रकारे बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीची अंडरवर्ल्ड डॉनशी मैत्री झाली होती. मात्र या मैत्रीमुळे तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. या अभिनेत्रीला निर्मात्याने आपल्या चित्रपटात घेण्यास नकार दिला होता. ज्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला होता. अनिता अयुब असे या अभिनेत्रीचे नाव आहे. ती पाकिस्तानी अभिनेत्री आहे.
अनिता अयुब ही पाकिस्तानची रहिवासी आहे. पाकिस्तानमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ती मॉडेलिंग करण्यासाठी हिंदुस्थानात आली होती. अनेक जाहिरातीत तिला काम मिळाले. यानंतर तिने मॉडेलिंग देखील केले. यादरम्यान अनिताने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. देव आनंद यांच्या प्यार का तराना या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले.
अनिताने देव आनंदसोबत गँगस्टरमध्ये काम केले होते. मात्र या चित्रपटादरम्यान तिच्या दाऊद इब्राहिमसोबतच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र अनिताने दाऊदसोबतचे नाते कधीच स्वीकारले नाही. अनिताने बॉलिवूडमध्ये फार कमी चित्रपटात काम केले होते. प्राथमिक माहितीनुसार, अनिताला एक लोकप्रिय निर्माता जावेद सिद्दिकी यांनी त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला होता. अनिताला चित्रपट नाकारल्याने दाऊदने त्याची हत्या केली होती.
अनिता तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त अंडरवर्ल्डमधील मैत्रीमुळे चर्चेत राहिली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोपही तिच्यावर होता. एका पाकिस्तानी मासिकात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता. लोकांना वाटते की अनिता पाकिस्तानची गुप्तहेर आहे. त्यामुळे त्याच्यावर बॉलिवूडमधून बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यानंतर अभिनय सोडून ती पाकिस्तानला परतली, असे त्या मासिकात म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List