माधुरी दीक्षित दगडाच्या काळजाची, तिला दुसरा पुरुष…, प्रसिद्ध अभिनेत्याची मेहुणी ‘धक धक गर्ल’ला असं का म्हणाली?

माधुरी दीक्षित दगडाच्या काळजाची, तिला दुसरा पुरुष…, प्रसिद्ध अभिनेत्याची मेहुणी ‘धक धक गर्ल’ला असं का म्हणाली?

Madhuri Dixit Love Life: अभिनेत्री संजय दत्त कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे आनंदी आहे. पण एका काळ असा होता जेव्हा माधुरी तिच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत होती. एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मेहुणीने माधुरीवर गंभीर आरोप केले होते. तेव्हा देखील माधुरी तुफान चर्चेत आली होती. माधुरीवर गंभीर आरोप करणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेता संजय दत्त याची मेहुणी एना शर्मा केले होते.

अभिनेता संजय दत्त यांचं नाव 1993 च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. तेव्हा संजय दत्त याची पहिली पत्नी कॅन्सराचा सामना करत होती. अभिनेत्याची पहिली पत्नी रिचा शर्मा हिच्यावर अमेरिकेत उपचार सुरु होते. तेव्हा संजय दत्त अनेक संकटांचा सामना करत होता.

याच काळात संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यामध्ये देखील जवळीक निर्माण झाली होती. पण दोघांनी देखील यावर रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगत यावर बोलणं टाळलं होतं. तेव्हा रिचा शर्मा हिला संजय दत्त आणि माधुरी दीक्षि यांच्या नात्याबद्दल माहिती झालं होतं. त्यामुळ रिचा अमेरिकेतील उपचार सोडून मुंबईत आली होती.

रिचा शर्मा मुंबईत आली तेव्हा संजय दत्त पत्नी आणि मुलगी त्रिशाला हिला विमानतळावर घ्यायला देखील पोहोचला नव्हता. लेखक यासिर उस्मान यांच्या ‘संजय दत्त : द क्रिझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड बॅड बॉय’ पुस्तकात याबद्दल लिहिलं आहे.

रिचाने अभिनेत्याला घटस्फोटाबद्दल विचारलं, तेव्हा संजूबाबा पत्नीच्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर दिलं नाही. माधुरी आणि संजय यांच्यातील नातं दिवसागणिक घट्ट होत होतं आणि त्याचा परिणाम अभिनेत्याच्या पत्नीच्या प्रकृतीवर दिसून येत होता. अखेर रिचा हिने 10 डिसेंबर 1996 मध्ये अखेरचा श्वास घेतला.

रिचा शर्मा हिच्या निधनानंतर तिच्या बहिणीने माधुरीवर घर तोडल्याचे आरोप केले होते. एका मुलाखतीत एना शर्मा हिने माधुरीवर संताप व्यक्त केला होता. धक धक गर्लवर गंभीर आरोप करत एना शर्मा म्हणाली, ‘माधुरी दगडाच्या काळजाची आहे. तिला दुसरा कोणताही पुरुष भेटला असता. पण माधुरीने माझ्या बहणीचा संसार मोडला…’ आज माधुरी – संजय त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. पण त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;