बॉयफ्रेंडकडून विनयभंग, अंडरवर्ल्डकडून धमक्या, माफियाविरोधातही लढली.. कोण आहे ही टॉप बॉलिवूड स्टार?

बॉयफ्रेंडकडून विनयभंग, अंडरवर्ल्डकडून धमक्या, माफियाविरोधातही लढली.. कोण आहे ही टॉप बॉलिवूड स्टार?

संघर्ष हा लोकांना आणखी ताकदवान आणि संयमी बनवतो. आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यातूनच माणूस घडत जातो. बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटासुद्धा याचंच एक उदाहरण आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वसामान्य मुलगी ते ‘पंजाब किंग्स’ या क्रिकेट संघाची मालकीण बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. या प्रवासात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी प्रितीने तिच्या वडिलांना गमावलं होतं. एका कार अपघातात त्यांचं निधन झालं होतं.

प्रितीचा जन्म 31 जानेवारी 1975 रोजी झाला. तिचे वडील दुर्गानंद झिंट हे भारतीय सैन्य अधिकारी होते. एका कार अपघातात त्यांचं निधन झालं होतं. यात अपघातात प्रितीची आई निलप्रभा गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर जवळपास दोन वर्षांपर्यंत त्या बेडवरच खिळून राहिल्या होत्या. या घटनेनंतर प्रितीचं संपूर्ण आयुष्यच बदललं होतं. प्रितीला दीपांकर आणि मनिष असे दोन भाऊ आहेत. 1996 मध्ये प्रितीने मॉडेलिंगला सुरुवात केली. पर्क चॉकलेट्सच्या जाहिरातीत ती पहिल्यांदा झळकली होती.

2003 मध्ये प्रिती झिंटा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. भरत शाह प्रकरणात तिने माफियांविरुद्ध साक्ष दिली होती. ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटात गुंतवणूक करणाऱ्या भरत शाहला अंडरवर्ल्ड बॉस छोटा शकीलशी संबंध असल्याच्या आरोप अटक करण्यात आली होती. सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या साक्षीदारांनी त्यांचा जबाब वारंवार बदलला होता. मात्र प्रिती तिच्या जबाबावर ठाम होती. याबद्दल दोन महिन्यांसाठी तिला साक्षीदार संरक्षण देण्यात आलं होतं. तिच्या धाडसाची सर्वत्र प्रशंसा झाली होती. गॉडफ्रे यांच्या ‘माइंड ऑफ स्टील’ पुरस्कार जिंकणारी ती पहिली ठरली होती. 2006 पासून ती गॉडफ्रे फिलिप्स ब्रेव्हरी अवॉर्ड्सची ब्रँड ॲम्बेसेडर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Punjab Kings (@punjabkingsipl)

प्रिती झिंटा फेब्रुवारी 2005 पासून मे 2009 पर्यंत बिझनेसमन नेस वाडियासोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांचं नातं सतत माध्यमांमध्ये चर्चेत होतं. इतकंच नव्हे तर हे दोघं साखरपुडा करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र 2014 मध्ये प्रितीने नेस वाडियावर विनयभंग, धमक्या आणि वानखेडेवरील आयपीएल मॅचदरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप केला. प्रितीने नेस वाडियाविरोधात अधिकृत तक्रारसुद्धा दाखल केली होती.

प्रितीने 2016 मध्ये अमेरिकन बिझनेसमन जीन गुडइनफशी लग्न केलं. 2021 मध्ये प्रितीला सरोगसीच्या माध्यमातून जुळी मुलं झाली. यावर्षी या दोघांच्या लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;