प्रियांका चोप्राच्या नवऱ्यावर शार्प शूटरने साधला निशाणा? जीव मुठीत घेऊन पळाला निक जोनस, व्हिडीओ समोर

प्रियांका चोप्राच्या नवऱ्यावर शार्प शूटरने साधला निशाणा? जीव मुठीत घेऊन पळाला निक जोनस, व्हिडीओ समोर

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि पॉप स्टार निक जोनस याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये निक त्याच्या सुरक्षारक्षकांना हाताने काही इशारा करत पळताना दिसत आहे. निक जोनास भाऊ केविन आणि जो जोनास यांच्यासोबत प्राग येथे मंगळवारी त्यांच्या डेज वर्ल्ड टूरचा भाग म्हणून कार्यक्रमात परफॉर्म करत होता. याच इव्हेंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये निक आपल्याला लेझरद्वारे लक्ष्य केलं जात असल्याचं समजल्यानंतर त्वरीत स्टेजवरून पळताना दिसला.

व्हिडीओमध्ये परफॉम करत असताना निक जोनस त्याच्या चाहत्यांकडे पाहाताना दिसत आहे. पण त्यानंतर सुरक्षारक्षकांना इशारा करत निकने स्टेजवरून पळ काढला. व्हिडीओ निकच्या एका चाहत्यांने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांची देखील चिंता वाढली आहे. तर अनेकांनी निकच्या सुरक्षेसंबंधी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jonas Daily News (@jonasdailynews_)

 

व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘जोनस ब्रदर्सना रात्री प्राग येथील शो काही काळ बंद करावा लागला. कारण एका प्रेक्षकांमधील एका निकच्या डोक्यावर लेझर लाईटच्या माध्यमातून निशाणा साधला. त्या व्यक्तीला कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून कार्यक्रम सुरु करण्यात आला…’ असं लिहिलं आहे.

 

निकच्या डोक्यावर दिसली लेझर लाईट

निकचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये निकच्या डोक्यावर लाल रंगाची लेझर लाईट दिसत आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे.

निक याचे कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. पण जोनस ब्रदर्सकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. जोनास ब्रदर्सचा शेवटचा परफॉर्मन्स रविवारी पॅरिसमध्ये होता आणि आता जोनास ब्रदर्सचा बुधवारी पोलंडमधील क्राको येथे कॉन्सर्ट आहे. प्रियांका चोप्राचे चाहतेही या घटनेमुळे खूप चिंतेत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;