Mumbai fire news – अंधेरीतील लोखंडवाला परिसरात 14 मजली इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू
मुंबईतील अंधेरी येथे लोखंडवाला परिसरामध्ये बुधवारी सकाळी 14 मजली इमारतीला भीषण आग लागली. सकाळी आठच्या सुमारास ही आग लागली. या आगीमध्ये होरपळून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.
अंधेरीतील लोखंडवाला परिसरात असणाऱ्या रिया पॅलेस या 14 मजली इमारतीच्या 10व्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटला बुधवारी सकाळी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये तीन जण होरपळले होते.
तिघांनाही कूपर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चंद्रप्रकाश सोनी (वय – 74), कांता सोनी (वय – 74) आणि पेलुबेटा (वय – 42) अशी मृतांची नावे आहेत.
STORY | 3 killed as fire breaks out in multi-storey building in Mumbai
READ: https://t.co/1HpH7npjhC pic.twitter.com/BMGj7p6q8P
— Press Trust of India (@PTI_News) October 16, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List