फायरिंग, धमकी, मित्राची हत्या… सलमान खान मागणार माफी? जवळच्या व्यक्तीकडून मोठी अपडेट समोर

फायरिंग, धमकी, मित्राची हत्या… सलमान खान मागणार माफी? जवळच्या व्यक्तीकडून मोठी अपडेट समोर

Salman Khan: 1998 साली झालेल्या काळवीट शिकार प्रकरणी गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या निशाण्यावर अभिनेता सलमान खान आहे. सलमान खान याला धमकावण्यासाठी बिश्नोई गँगने भाईजानच्या घराबाहेर गोळीबार देखील केला. एवढंच नाही तर, सलमान खानचे खास मित्र आणि ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या देखील केली. जो कोणी सलमान खानची मदत करेल, त्याने स्वतःचा हिशेब करावा… अशी धमकी देखील लॉरेन्स बिश्नोई याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारताना दिली .

अखेर मित्राच्या हत्येनंतर तरी सलमान खान, बिश्नोई समाजाची माफी मागेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर सलमान खान याच्या जवळच्या व्यक्तीने मोठी माहिती दिली आहे. सलमान खान सर्वांसमोर बिश्नोई समाजाची माफी मागेल की, खासगी रित्या माफी मागेल? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ‘जर सलमान खान याप्रकरणी माफी मागणार असेल, तर तो याप्रकरणात अडकला आहे. सलमान अशा कोणत्याच गोष्टी माफी मागणार नाही, जी त्याने केली नाही. हे प्रकरण फक्त विश्वासावर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भाईजानने असं केलं, तो आता माफी मागेल असं वाटत नाही…’

सलमान खानच्या कुटुंबियांची वाढली चिंता

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. ‘कुटुंबियांसाठी फार काळजीचा विषय आहे. जेव्हा सलमान सर्वांसमोर बाहेर निघतो किंवा शुटिंगसाठी बाहेर जातो तेव्हा तणावपूर्ण वातावरण असतं. कुटुंबियांची काळजी आणि चिंता वाढलेली असते. पण याप्रकरणी कुटुंबिय देखील सलमान खानच्या सोबत उभे आहेत..’ असं देखील सांगण्यात आलं आहे.

सलमान खान याने माफी मागितली नाही तर…

‘सलमान खान याने माफी मागितली नाही तर, सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांवर दबाव येईल. बिग बॉस 18 च्या एपिसोड्सच्या शूटिंगसाठी तो दर आठवड्याला प्रवास करणार हे तर्क लक्षात घेऊन त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात येईल. शिवाय सलमान खान आगामी सिनेमांचं शुटिंग देखील वेळेत पूर्ण करणार आहे.’

‘सतत मिळत असणाऱ्या धमक्यांमुळे सलमान खान स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करणार नाही. ठरलेल्या वेळेत सलमान सर्व सिनेमाच्या शुटिंग पूर्ण करेल…’ सलमान खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘सिकंदर’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्री रश्मिता मंदना मुख्य भूमिकेत झळकणार आहे…

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;