कितीही मोठे झालो तरी पायरी सोडायची नाही; ‘बिग बॉस मराठी’ फेम डीपीचा व्हीडिओ चर्चेत
‘बिग बॉस मराठी’ चा यंदाचा सिझन चांगलाच गाजला. या सिझनमधील स्पर्धकांची जोरदार चर्चा झाली. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनंजय पोवार देखील ‘बिग बॉस मराठी’च्या या सिझनमध्ये होता. त्याचा गेम आणि ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील वावर प्रेक्षकांना आवडला. ‘बिग बॉस मराठी’ तील टॉप 4 मध्ये होता. आता ‘बिग बॉस मराठी’ संपला आहे. सगळे स्पर्धक आपआपल्या घरी आले आहेत. डीपी म्हणजेच धनंजय पोवार देखील त्याच्या घरी आला आहे. आता त्याने त्याचे रूटिन व्हीडिओ शेअर करायला सुरुवात केली आहे. त्याचा असाच एक व्हीडिओ सध्या चर्चेत आला आहे.
डीपीचा व्हीडिओ चर्चेत
डीपी हा मूळचा कोल्हापूरचा आहे. तिथं त्याचं ‘सोसायटी’ हे फर्निचरचं दुकान आहे. या दुकानातील त्याचा रुटिन व्हीडिओ धनंजयने शेअर केला आहे. कितीही मोठी उंची प्राप्त होऊ दे, आपली पायरी आपण सोडायची नाही, असं म्हणत धनंजयने व्हीडिओ शेअर केलाय. या व्हीडिओत तो त्याच्या दुकानातील रोजच्या कामांमध्ये व्यस्त दिसतोय. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
डीपीच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस
डीपीच्या या व्हीडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. दादा तुम्ही अशी लाख मोलाची माणसं कमवली तर अजून काय पाहिजे आयुष्यात… डीपीदादा तुम्ही आमच्यासाठी दुसरे आदरणीय लक्ष्मीकांत बेर्डे आहात…, अशी कमेंट डीपीच्या चाहत्याने केली आहे. लई दिवस झालं दुकानातल्या पार्टीचा व्लॉग आला नाही आता दसऱ्या नंतर होऊन जाऊदे, अशीही डिमांड चाहत्याने व्यक्त केलीय.
‘बिग बॉस मराठी’ च्या यंदाच्या सिझनमधील स्पर्धक पुरुषोत्तम पाटील यानेही डीपीच्या व्हीडिओवर कमेंट केली आहे. ‘बिग बॉस मराठी’ च्या घरातील डीपी आणि पुरुषोत्तम एकत्र होते. आयुष्यात DP दादा ह्या व्यक्तीसोबत मैत्री व्हावी, ही ईच्छा होती. ती इच्छा पांडुरंगाच्या कृपेने बिगबॉस च्या घरात पूर्ण झाली. डीपी दादाच्या मैत्रीने आयुष्यात श्रीमंत आणि समृद्ध झालो, असं पुरुषोत्तम पाटील याने म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List