प्रियांका गांधी वायनाडमधून लढणार, पोटनिवडणूक जाहीर

प्रियांका गांधी वायनाडमधून लढणार, पोटनिवडणूक जाहीर

महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतानाच निवडणूक आयोगाने केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. वायनाड मतदारसंघातून काँग्रेसने प्रियांका गांधी यांना पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरवले  आहे.

काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड मतदारसंघातून  विजयी झाले आहेत. राहुल गांधी यांनी रायबरेलीची जागा कायम ठेवली आणि वायनाडचा राजीनामा दिला. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. वायनाडमधून प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे प्रियांका गांधी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. वायनाडमध्ये 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

नांदेडमध्येही पोटनिवडणूक

काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील विधानसभेबरोबरच 20 नोव्हेंबरला नांदेड लोकसभेसाठी मतदान होईल आणि 23 तारखेला निकाल लागेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;