आता फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही! मनोज जरांगे यांचा इशारा 

आता फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही! मनोज जरांगे यांचा इशारा 

‏सत्तेत असूनही आरक्षण न देऊन मराठय़ांचे वाटोळे करणाऱया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

मराठय़ांना डिवचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम 17 जातींचा समावेश ओबीसीत केला, पण मराठय़ांना आरक्षण दिले नाही. तेव्हाच आम्हाला लक्षात आले की हा माणूस मराठय़ांना आरक्षण देणार नाही. अखेर त्यांच्या पोटात जे होते, ते आता बाहेर आले आहे. ओबीसींमध्ये मराठय़ांशिवाय इतर जातींचा समावेश करून फडणवीस यांनी आम्ही मराठय़ांना मोजत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. आजपर्यंत मराठय़ांना आरक्षण द्यायचे की नाही, हा सत्ताधारी म्हणून त्यांचा निर्णय होता, मात्र आता त्यांना मतं द्यायची की नाही, हे मराठा समाजाच्या हाती आहे, असे जरांगे म्हणाले.

ज्या मराठय़ांनी सत्तेवर बसवले त्याच मराठय़ांच्या पोरांचे आयुष्य बेचिराख कसे करता येईल, यासाठी फडणवीस यांनी अनेक प्रयत्न केले. सत्तेचा वापर मराठय़ांच्या विरोधात केला. सरकार आपल्याला आरक्षण देईल अशी अपेक्षा मराठा समाजातील गोरगरीब जनतेला होती, मात्र आता ती अपेक्षा पह्ल ठरली, असे जरांगे म्हणाले.

मराठय़ांच्या पोरांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, कारण मराठा समाजातील पोरं मोठी झाली तर आपले काय होईल अशी फडणवीस यांना भीती वाटते. मराठय़ांची पोरं आरक्षणापासून तसेच नोकऱयांपासून शिक्षणापर्यंत वंचित राहिली पाहिजेत, भिकारी झाली पाहिजेत असे वचन फडणवीस यांनी घेतले होते. त्यासाठी त्यांनी सत्तेचा गैरवापर करून मराठय़ांच्या विरोधात अनेक षड्यंत्रे रचली, असा आरोपही जरांगे यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;