चिनी सैन्याची तैवानच्या हद्दीत घुसखोरी

चिनी सैन्याची तैवानच्या हद्दीत घुसखोरी

चीन आणि तैवानमध्ये तणाव वाढला आहे. चिनी सैन्याने तैवानच्या सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. तैवानच्या एका अधिकाऱयाने चीनवर आपल्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, चीनची 12 विमानवाहू जहाजे आणि 14 पाणबुडय़ा तैवानच्या सीमेवर दिसून आल्या. 153 विमानांपैकी 111 विमानांनी तैवानच्या हद्दीत प्रवेश केला. चीनच्या हालचालींमुळे तैवानमध्ये चिंता वाढली असून, परिस्थिती तणावग्रस्त बनली आहे. तैवान चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना लागू करत आहेत. तैवाननेही विमाने आणि लढाऊ जहाजे सज्ज ठेवली आहेत.

काय आहे वाद?

चीनने तैवानला त्यांचा भाग असल्याचे म्हटले आहे. मात्र तैवानच्या म्हणण्यानुसार ते लोकशाही पद्धतीने शासित असून एक स्वतंत्र देश आहे. चीनच्या या भूमिकेमुळे दोन्ही देशांमध्ये सतत संघर्षाचे वातावरण असते. तैवानचे अध्यक्ष लाइ चिंग-ते यांच्या म्हणणण्यानुसार, त्यांनी चीनच्या दाव्यांना विरोध केला आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला तैवानचे प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानानंतर चीन आणखी संतप्त झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;